
मूल्यवर्धन प्रशिक्षण गणपतीनंतर घ्यावे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी जिल्हा शाखेने जिल्हा प्रशिक्षण संस्था (डाएट), रत्नागिरी यांच्याकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. १२, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी होणारे मूल्यवर्धन तालुकास्तरीय प्रशिक्षण गणपतीच्या सुट्ट्यानंतर आयोजित करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने एका पत्राद्वारे केली आहे.
शिक्षक संघाच्या म्हणण्यानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पूर्वतयारीसाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण ठेवल्यास शिक्षकांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी तयारी करणे अवघड होईल.
www.konkantoday.com