
मासेमारी करताना काळबादेवी येथे समुद्रात पडलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू
काळबादेवी जेटीजवळ बोटीवर मच्छिमारी करत असताना तोल जाउन पडलेल्या प्रौढाचा मृतदेह तेथील समुद्रात मिळून आला.गजानन महादेव पेडणेकर (45,रा.नेवरे काजीरभाटी,रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गजानन पेडणेकर हा गुरुवार 7 ऑगस्ट रोजी काळबादेवी येथील जेटीजवळ बोटीवर मासेमारी करत असताना त्याचा तोल जाउन तो समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. याबाबत समिर अशोक शेट्ये (रा.काळबादेवी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली होती. दरम्यान, काळबादेवी गावातील ग्रामस्थ तेथील समुद्र किनारी त्याचा शोध घेत असताना शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.