
मतदानानंतर बेकायदेशीर रॅली प्रकरणी माजी आमदार संजय कदम, वैभव खेडेकरांसह ३३ जण निर्दोष
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर सायंकाळच्या सुमारास जमाव करत बेकायदेशीरपणे रॅली काढून आचारसंहितेसह मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या ठपक्यातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने ऍड. अविश्वन भोसले यांनी काम पाहिले.
२०१९ मध्ये संजय कदम विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ मध्ये मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मतदानानंतर संजय कदम, वैभव खेडेकर व अन्य कार्यकर्त्यांनी सायंकाळी चारचाकी वाहने व दुचाकीवरून, कर्णकर्कश हॉर्न वाजवत रॅली काढली होती.
या प्रकरणाची येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्यासमोर गुरूवारी सुनावणी झाली असता ऍड. भोसले यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत ३३ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी २८ साक्षीदार तपासण्यात आले.www.konkantoday.com