
भर श्रावण महिन्यातही हापूसला मोहोर
भर पावसाच्या हंगामात रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे हापूस आंबा कलमांना अकाली मोहोर आल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असून उन-पावसाची उघडीप सुरू आहे. या अनियमित हवामानाच्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा कलमांना फुलोरा दिसून येत आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा खेळ सुरू आहे. कधी मुसळधार पाऊस तर कधी अचानक ऊन या वातावरणामुळे श्रावण महिन्यातच काही कलमांना मोहोर येवू लागला आहे. ऊन-पावसाच्या बदलत्या चक्रामुळे आंबा झाडांच्या वाढीच्या नैसर्गिक प्रक्रियेत गडबड झाली असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात आलेला मोहोर पुढील फळधारणेसाठी उपयुक्त नसतो. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.www.konkantoday.com