
ठेकेदारावर कारवाईसाठी वैभव खेडेकर यांचे बांधकाम मंत्र्यांना साकडे
गेल्या १८ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेधारक कंपनीकडून मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. अधिकार्यांचाही ठेकेदारांवर अंकुश नसल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देण्यात आले.
www.konkantoday.com