
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत गट-गण रचनेवर हरकतींचा पाऊस
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेध लागले असून, सध्या गट व गणरचनेबाबत हरकतींवर सुनावणी सुरू आहे. जिल्ह्यात ५० हरकती असून त्यावर कोकण आयुक्तांकडे नुकतीच सुनावणी झाली. याबाबत ११ ऑगस्टपर्यंत निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या हरकतींपैकी सर्वाधिक हरकती या जि.प. व पं.स. गटांच्या नाव बदलाबाबत आल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, नगर परिषदांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनांच्या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. जि.प. व पं. स. गणांच्या रचनेबाबत जिल्ह्यातून ५० हरकती आल्या आहेत. या हरकती सुनावणीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आल्या आहेत. बुधवारी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. व पं. स. गट आणि गणांबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी झाली. जिल्ह्यात आलेल्या ५० हरकतींपैकी ३५ एक हरकती या गट व गणांच्या नावात झालेल्या बदलांवरून आल्या आहेत.www.konkantoday.com