
चिपळूण येथील खेर्डी एमआयडीसी परिसरात कचर्याचे ढिग
चिपळूण येथील खेर्डी एमआयडीसी परिसरात कचर्याचे ढिग साठतच चालले आहेत. दुर्गंधी, रोगजंतूंचा फैलाव आणि प्रशासनाचे निष्क्रियपण यामुळे स्वच्छ भारत मिशनची वाटचाल कागदावरच राहिली आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना याचा संताप येत आहे. तर यातील काही बेजबाबदार लोक ही कृती करताना दिसत आहेत, असे चित्र आहे. यामुळे एमआयडीसी प्रशासन हतबल झाले आहे.
इथे गेली अनेक वर्षे लोक कचरा टाकत असतात. त्यावेळी खेर्डी गावात कचरा गाडी फिरत नव्हती पंतु इथे कचरा टाकणारे लोक हे खेर्डी येथील नसल्याचे एमआयडीसी प्रशासनाचे म्हणणे आहे. एमआयडीसी मार्ग असल्यामुळे लोक पहाटे वाहनांची वर्दळ कमी सते त्यामुळे अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी यतात. येताना रात्री घरातील कचरा, प्लास्टिक पिशवीत घेवून येतात. एमआयडीसी कार्यालय बाजूला एक निर्मनुष्य रस्ता आहे. या रस्त्यावर तसे कोणीच तसते. त्याचा फायदा घेत लोक तिथे कचरा टाकतात. तसेच खेर्डी ग्रामपंचायत येथून एक रस्ता या एमआयडीसीत जातो. तिथेही काही बेजबाबदार लोक कचरा टाकतात. कचरा टाकण्याच्या ठिकाणी ही गाई, बैल, कुत्रे यांना माहित झाली आहेत. ते तिथे सर्रास येतात. प्लास्टिकसह तिथला घाण झालेला कचरा चघळत असतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे.www.konkantoday.com