
गुहागर तालुक्यातील मळण मधलीवाडीतील घर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही
गुहागर ताक्यातील मळण मधलीवाडी येथील प्रतिभा दिलीप नाटुस्कर यांचे राहते घर अचानकपणे कोसळले होते. घर कोसळत असल्याचे निदर्शनास येताच या घरात राहणारी माणसे घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या वेळी फार माठी गंभीर दुर्घटना झाली असती परंतु दैव बलवत्तर म्हणून घरातील सर्वजण सुखरूप बचावले. नुकसानग्रस्त घराची शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी यांनी पाहणी केली.
www.konkantoday.com