
आज भाजपा तालुका दक्षिण रत्नागिरी, मार्फत, भाजप प्रदेश अध्यक्ष मा.आ.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने झरेवाडी येथील १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न…
📌 झरेवाडी गावातील यावर्षी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच विशेष प्राविण्य स्कॉलरशिप प्राप्त केलेल्या अशा एकूण ५२ विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य तसेच गौरव चिन्ह देऊन गुणगौरव आज भाजपा तर्फे करण्यात आला. यावेळी दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष सन्मा. दादा दळी, उपाध्यक्षा सौ. नेहा कळंबटे, तसेच भाजपा चे श्री. गुरुदास गोविलकर, श्री. राजा सांडीम, श्री. पवार, श्री. अवधूत कळंबटे, बूथ अध्यक्ष श्री. प्रवीण कळंबटे, श्री. जयवंत कळंबटे तसेच पोलिस पाटील श्री. बाळकृष्ण गोताड, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अनिल गोताड, मानकरी श्री. अनंत गोताड, वसंत कळंबटे, मोहन कळंबटे आणि अन्य ग्रामस्थ व महिला, विद्यार्थी उपस्थित होते.
📌 यावेळी श्री. दादा दळी यांनी शुभेच्छा देऊन शासनाच्या योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. अवधूत कळंबटे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल कळंबटे, करण कळंबटे, सुजल गोताड, अंकित कळंबटे, प्रसाद कळंबटे यांनी मेहनत घेतली.