
शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या पायाभूत परीक्षेसाठी शाळांना पुरवलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये कमतरता
शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या ८ वीपर्यंतच्या वर्गासाठीच्या पायाभूत चाचणी परीक्षा बुधवारपासून जिल्हाभरात सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका मात्र पुरेशा संख्येने पोहोचल्या नसल्याची तक्रार अनेक मुख्याध्यापकांनी केली.
शिक्षण विभागाने जिल्हाभरात पायाभूत परीक्षांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित अशा विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. गेल्यावर्षी शिकलेल्या विषयांमध्ये सद्यपरिस्थितीत किती प्रमाणात आकलन झाले आहे. विद्यार्थी किती प्रमाणात उपयोजन करू शकतात, हे या परीक्षेतून तपासले जाणार आहे. ही परीक्षा गतवर्षीच्या संपादणूक पातळीचे आकलन करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा मुख्याध्यापकांनी आपल्याला प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याचे सांगितले. आपले नाव छाप येऊ नये, अशी विनंती मुख्याध्यापकांनी केली. रत्नागिरीसह प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेचा तसेच शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांची कमतरता दिसून आली. पायाभूत परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकांची कमतरता हा यावर्षीच घडलेला मुद्दा नसून प्रतिवर्षी काहींना काही प्रश्न पत्रिका कमी पडतात व त्याची उपलब्धता शिक्षकांना आपल्या खिशातील ’पैसे खर्च करून करावी लागते, असे सांगण्यात आले. यापुढे विद्यार्थी संख्येप्रमाणे प्रश्नपत्रिका शाळांना पुरवल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
www.konkantoday.com