
लांजा तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी मुंबईतून केला जप्त
लांजा तालुक्यातील रूण पराडकरवाडी येथून चोरीला गेलेला ३ लाख ५५ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी मुंबईतून जप्त केला आहे .प्रणय संजय पराडकर (वय २५, राहणार रुण पराडकरवाडी) त्याने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की शेजारी राहणाऱ्या ऋषिकेश अंकुश पराडकर (वय २७ वर्षे राहणार रुण पराडकरवाडी) याने प्रणय पराडकर याच्या घराचे दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडून त्याच्या घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे ४५ हजार रुपये किमतीची व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली.
या तक्रारीनुसार पोलिसांनी ऋषिकेश अंकुश पराडकर याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर प्रणय पराडकर याच्या शेजारी राहणारे दुसऱ्या एका व्यक्तीनेही नंतर तक्रार दिली होती की त्यांच्या घरातून एक सोन्याची गंठण चोरीला गेलेली आहे व त्यांच्या घरी संशयित चोरटा ऋषिकेश पराडकर हा येत जात होता. त्यानंतर पोलिस तपासात ऋषिकेश पराडकर याने आपला गुन्हा कबूल केला होता.
ऋषिकेश पराडकर याने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेची कबुली दिल्यानंतर पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनखली ६ ऑगस्ट रोजी पोहेको नासिर नावळेकर सोबत पोहेको विलास जाधव व पोको नितेश आर्डे अशी तपास टीम करून ऋषिकेश पराडकर याने दिलेल्या माहिती नुसार मुंबई सांताक्रूझ येथे जाऊन गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी चोरीचा मुद्देमाल ५.३०० ग्रॅम व ३२.६०० ग्रॅम सोन्याची लगड असा सोन्याचा मुद्देमालजप्त करण्यात आलेला आहे.