रत्नागिरी शहरातून हजारो राख्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी पाठविल्या जाणार : निलेश आखाडे शहर सरचिटणीस.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त हजारो राख्या पाठविल्या जाणार असून. शहरातील वेगवेगळ्या भागातून महिलांना देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या योजना, वेगवेगळे लाभ याबाबत महिला वर्ग कृतज्ञता व्यक्त करत असून देवेंद्रजींना धन्यवाद पत्र देऊन आपल्याकडील एक राखी देवा भाऊंसाठी पाठवत आहेत. महिलांना माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण १००% मोफत योजना, जल जीवन मिशन योजना, आयुष्यमान भारत योजना असंख्य योजनांचा लाभ महिलांना मिळत असून महिला देखील स्वखुशीने देवा भाऊ यांच्यासाठी राख्या देत आहेत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देवा भाऊ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असून शहरातील महिलांकडून राख्या स्वीकारल्या जात आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधून शेकडो राख्या जमा झाल्या आहेत. रत्नागिरी शहरातून हजारो राख्या पाठवल्या जाणार आहेत अशी माहिती भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी दिली. भाजप रक्षाबंधनानिमित्त हा कार्यक्रम राबवत असून महाराष्ट्रामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, कोकण विभागात प्रदेश पदाधिकारी शिल्पाताई मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तर रत्नागिरी जिल्ह्यात सौ. मृणाल खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे तर रत्नागिरी शहरामध्ये दादा ढेकणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष पल्लवीताई पाटील यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातून व रत्नागिरी शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अजूनही कोणाला देवा भाऊ यांच्यासाठी राखी पाठवायची असेल तर आमचे भाजप पदाधिकारी किंवा भाजप जिल्हा कार्यालय येथे संपर्क साधून आपण देवा भाऊ यांच्यासाठी राखी पाठवू शकता. रक्षाबंधन या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी शहरातून शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ यांना जबाबदारी देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button