
मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट व गैर कृत्ये करणाऱ्या मंत्र्यांना पाठीशी न घालता त्यांचा राजीनामा घ्यावा…
ठाकरे शिवसेनेची मागणी : ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत व शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या महाराष्ट्रातील भ्रष्ट व गैर कृत्ये करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीशी न घालता राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच ठिकाणी रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, रिक्षासेना व सर्व अंगीकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व तसेच जिल्ह्यातील तमाम जनतेने या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार शिवसेना उपनेते बाळ माने, संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख रत्नागिरी (दक्षिण) दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख रत्नागिरी (उत्तर) बाळा खेडेकर यांनी केले आहे.