
त्या निवृत्त शिक्षिकेचा खुनी सापडला, दागिने व पैसा मिळवण्यासाठी, तरुणाचे हव्यासापोटी कृत्य
त्या निवृत्त शिक्षिकेचा खून दागिने व पैसा मिळवण्यासाठी एका तरुणाने केल्याचे आता उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे
चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील एका तरुणाने दागिने आणि पैशांसाठी हा खून केला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरु केला. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील एका तरुणाने दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत