
चिपळूण मधील धामणवणे तील निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचा उलगडा; काही घबाड मिळेल या आशेने खुनाचा प्लॅन आखलाओळखीच्या तरुणाकडून दागिन्यांसाठी खून
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय 68) यांच्या हत्येप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी वेगवान तपास करत उलगडा केला आहे. या प्रकरणात गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने व पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या खून प्रकरणात आणखी एका आरोपीचा समावेश असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याचे नाव लवकरच उघड केले जाणार आहे याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
आरोपी तरुण जयेश गोंधळेकर हा मूळ गोंधळे गावचा आहे तो मध्यंतरी सातारा येथे कामाला होता त्यानंतर तेथील नोकरी सोडून तो गावात आला होता गावात आल्यावर त्याने ट्रॅव्हल एजंट म्हणून काम सुरू केले होते सेवानिवृत्त असलेल्या शिक्षिका जोशी या सेवानिवृत्त झाल्यानंतर फिरण्यासाठी वेगवेगळ्या सहलीसाठी मधून जात होत्या त्यातूनच आरोपीची त्यांची ओळख झाली होती ,आर्थिक गरजेतून त्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. घराचा दरवाजा तोडलेला नसून, आतूनच उघडून खून करण्यात आला असल्याने सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीकडूनच गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
गुरुवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाला. वार्ताच कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केल्याचे आढळले.
वर्षा जोशी या दाभोळ (ता. दापोली) येथील महाकाळ कुटुंबातील असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी नर्मदा परिक्रमाही पूर्ण केली होती आणि काही दिवसांत हैदराबादला जाण्याचा त्यांचा मानस होता. मैत्रिणीचा संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला व एका तरुणाला चौकशीसाठी पाठविल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. जोशी या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठे घबाड असावे असा आरोपीचा अंदाज होता त्यातूनच त्यांच्या खुनाचा प्लॅन आखला गेला आरोपीचे नेहमी जाणे येणे असल्याने त्यांना घराची माहिती होती त्या घरात एकट्याच राहत असल्याने सीसीटीव्ही बसवल्याचीही त्याला माहिती होती त्यामुळे खूनाच्या उद्देशाने तो घरात शिरल्यावर त्याने वर्षा जोशी यांना दोरीने बांधले त्यांनी विरोध सुरू करतात त्यांच्या तोंडात व नाकावरत्यांच्याच कपड्याचे गोळे कोंबले त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आरोपीने त्यांच्या घरातील झाड झडती घेऊन सत्तावीस हजार रुपये रोख व सोन्याचे बांगड्या व सोन्याची चैन असा ऐवज चोरून नेला मात्र त्याला अपेक्षा होती त्याप्रमाणे ऐवज मिळाला नाही सीसीटीव्ही असल्याने आपली ओळख सर्वांना कळेल म्हणून त्याने जातेवेळी सीसीटीव्हीची हार्ड डिक्स काढून घेतली व तेथून पलायन केले मात्र पोलिसांना याबाबतचे काही पुरावे मिळाले होते त्यामुळे या घटनेचा आरोपीचा हात असावा हे स्पष्ट झाले होते अखेरीस पोलिसांनी आरोपीच्या मुसक्याआवळल्या आरोपीने लपून ठेवलेली हार्ड डिस्क व अन्य काही दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत आरोपीचा आणखीही एक साथीदार असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळत आहे मात्र पुढील तपासासाठी याबाबत पोलिसांनी त्याचे नाव अजून उघड केलेले नाही हा प्रकार घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मोठी कामगिरी बजावत आरोपीला तात्काळ अटक केले आहे