
खेडमध्ये चोरीच्या इराद्याने फिरणारा संशयित ताब्यात
खेड : शहरातील इंद्रप्रस्थ हॉटेल ते जसनाईक रिपेरिंग सेंटरदरम्यान हातात लोखंडी सळी घेवून चोरीच्या उद्देशाने फिरणार्या संशयिताला गस्त घालणार्या पोलिसांनी ताब्यात घेतले. हरी रामशब्द लाल (३८, रा. उत्तरप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २४ इंच लांबीची धातूची सळी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हातात लोखंडी सळी घेवून संशयितरित्या फिरत होता. रात्री गस्त घालणार्या पोलिसांनी त्यास हटकले असता अंधाराचा फायदा घेत एका दुकानाशेजारी जावून लपला. पोलिसांनी शोधून काढत त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.www.konkantoday.com