
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांना गणेशोत्सव काळात अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत आहे. विशेषतः जनशताब्दी, तुतारी, आणि सावंतवाडी-दिवा पॅसेंजर यांसारख्या कायम गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये जादा डबे वाढवल्यास शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.सध्या अनेक गाड्यांमध्ये आसन क्षमता कमी असल्याने प्रवाशांना आरक्षण मिळत नाही, ज्यामुळे त्यांना प्रवास करणे शक्य होत नाही. जुन्या रचनेच्या गाड्यांमध्ये 24 डबे बसवता येत होते, तर नव्या गाड्यांमध्ये 22 डबे आहेत. यामुळे काही गाड्यांमध्ये पूर्वीपेक्षा कमी डबे असल्याने गर्दीची समस्या वाढली आहे.