
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोेळे रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावर जीवघेणे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या रस्त्यातून पाण्यासाठी ३ मीटरची पाईपलाईन मध्यातून टाकल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न मिरजोळे ग्रामस्थांनी विचारला आहे यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेतली बांधकाम खात्याच्या या रस्त्यावर उत्खनन करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा यावेळी ग्रामस्थांनी वाचला. यावेळी उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेही उपस्थित होत्या.
www.konkantoday.com