
आजीला बघण्यासाठी लांजाहुन देवरुख ला गेलेली विवाहिता बेपत्ता
माहेरी देवरुख येथे आजीला बघून येते असे सांगून बाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत लांजा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. श्रध्दा श्रध्देश मोरे (29,मुळ गाव भांबेड कुडेवाडी लांजा,रत्नागिरी सध्या रा.विले पार्ले ईस्ट मुंबई) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ती सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वा. पासून बेपत्ता झाली आहे.
याबाबत तिचा पती श्रध्देश तुळशीराम मोरे (30,मुळ गाव भांबेड कुडेवाडी लांजा,रत्नागिरी सध्या रा.विले पार्ले ईस्ट मुंबई) याने 6 जुलै रोजी लांजा पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,सोमवार 4 ऑगस्ट रोजी श्रध्दा मोरे ही विवाहिता मुळ गाव भांबेड लांजा येथून सकाळी 9 वा. पती आणि सासू-सासरे यांना मी माहेरी देवरुख बामणोली येथे आजीला बघून संध्याकाळपर्यंत परत येते असे सांगून घरातून निघून गेली. परंत, ती परत घरीच न परतल्यामुळे तिच्या पतीने लांजा पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली.