चिपळूण-संगमेश्वर’मध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता, बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

’जिल्हयाच्या राजकारणात गेले काही दिवस चर्चेत असलेल्या येथील बलाढ्य नेत्याची मंगळवारी मुंबईत भाजप नेते व मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत मह महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत या नेत्याची भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून शक्यतो १९ ऑगस्टचा मुहूर्त काढला गेला आहे. झालेली बैठक आणि पक्षप्रवेश याबाबतचे वृत्त मंगळवारी येथे धडकताच राजकीय वर्तुळात सर्वत्र खळबळ उडाली.विधानसभा निवडणुकीनंतर कमळ फुलवण्याच्यादृष्टीने भाजपने जिल्हयात प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशातच येथील राजकारणातील एक महत्वपूर्ण चेहरा भाजपच्या हाताला लागल्याने भविष्यात येथे कमळ फुलण्याच्या आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, नीतेश राणे यांच्याबरोबर या नेत्याची बैठक झाली. बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातून राजेश सावंत, सतीश मोरे या दोन्ही जिल्हाध्यक्षांबरोबर विनोद भुरण, प्रमोद अधटराव या तालुकाध्यक्षांनाही मुंबईत बोलावण्यात आले होते. या सर्वांशी या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button