
वीर परिवार सहायता योजना” अंतर्गत विधी सेवा केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी, दि.7 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात “वीर परिवार सहायता योजना २०२५” अंतर्गत विधी सेवा केंद्र स्थापन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र रा. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी जिल्हा कोषागार अधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे , कार्यालयीन कर्मचारी तसेच वीरनारी, वीर माता-पिता, व सर्व तालुका सैनिक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व माजी सैनिक उपस्थित होते.
या केंद्राच्या स्थापनेमुळे आजी/माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता व अवलंबितांना कायदेशीर मार्गदर्शन आणि मोफत सेवा मिळण्याचा मार्ग खुले झाला आहे. पदापत्र, पेन्शन, जमिनीचे हक्क, न्यायालयीन प्रकरणे यांसारख्या विषयांवर त्वरित आणि विनामूल्य सल्ला देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमामुळे आजी/माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची कायदेशीर साक्षरता वाढून, आपले हक्क व सुविधा याविषयी जागरूकता निर्माण होईल. सैनिकांच्या योगदानास सन्मान देणारा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञतेची प्रत्यक्षात उतरलेली भावना आहे.
000