
लांजा आराखड्याविरोधात १५ ऑगस्टला लाक्षणिक उपोषणाचा निर्धार
लांजा नगर पंचायतीच्या प्रारूप शहर विकास आराखड्याला जोरदार विरोध होत आहे. लांजा-कुवे बचाव समितीने या आराखड्याविरोधात १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदन नगर पंचायत कार्यालयात सादर करण्यात आले.
लांजा नगर पंचायतीने विकास आराखडा तयार करण्यासाठी टंडन या खासगी कंपनीची नेमणूक केली होती. मात्र या कंपनीने प्रत्यक्ष मैदानावर न जाता, ना नागरिकांशी चर्चा करता फक्त कार्यालयात बसून आराखडा तयार केल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. लांजा व कुवे गावांतील नागरिकांनीही अशाच प्रकारची नाराजी व्यक्त केली असून या आराखड्यामुळे त्यांच्या मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com