
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांना गती, २४९ जणांच्या बदल्या
गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. गेल्या २ वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया सुरू झाल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी एकूण सात टप्यांत होणार्या बदली प्रक्रियेपैकी चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत २४९ शिक्षकांच्या बदल्या झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२ वर्षांपासून ही बदली प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांना बदलीची प्रतीक्षा करावी लागत होती व बदलीपात्र शिक्षकांची संख्याही वाढली होती. यापूर्वी झालेल्या आंतरजिल्हा आपसी बदलीतील शिक्षकांनी त्यांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ज्यामुळे प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यासोबतच संचमान्यता हा एक मोठा अडथळा ठरला होता.
www.konkantoday.com