
रत्नागिरीत अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे दिनांक 03 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांचे वतीने अंगदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मा.अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी अधिष्ठाता
डॉ.रामानंद यांनी अंगदानबाबत उपस्थित नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी , आंतरवासिता डॉक्टर व अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानबाबत जनजागृती करण्यास आवाहन देखील केले. सदर अंगदान जीवन संजीवनी अभियान रॅलीची सुरुवात मा. अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी झेंडा दाखवून केली.

अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथून सुरू होऊन बस स्टॅन्ड व बस स्टॅन्ड पासून परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे समाप्त झाली. सदर अंगदान रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी व आंतरवासिता डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रॅली यशस्वी केली.
सदर अंगदान रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. रामा भोसले, अधिसेविका सौ. जयश्री शिरधनकर व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.