
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीचे वेळापत्रक जाहीर!
मुंबई : पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीचे वेळापत्रक बुधवारी सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना 9 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून, 10 ऑगस्ट रोजी राज्य कोट्यासाठीची सर्वसामान्य यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची 14 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीपूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमधून दोन निवड यादी जाहीर झाल्यानंतर तिसर्या फेरीसाठीचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार तिसर्या फेरीसाठी नव्याने नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 6 ते 9 ऑगस्टदरम्यान नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसामान्य यादी व अंतरिम यादी 10 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तिसर्या फेरीसाठीचा रिक्त जागांचा तपशील 11 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
असे असणार वेळापत्रक
नोंदणी – 6 ते 9 ऑगस्ट
सर्वसामान्य गुणवत्ता यादी – 10 ऑगस्ट
रिक्त जागांचा तपशील (तिसरी फेरी) – 11 ऑगस्ट
पसंतीक्रम भरण्याची मुदत – 11 व 12 ऑगस्ट
तिसर्या फेरीतील निवड यादी – 14 ऑगस्ट
प्रवेश कालावधी (तिसरी फेरी) – 16 ते 20 ऑगस्ट
मुक्त फेरीसाठी टप्पे
रिक्त जागा (मुक्त फेरी) – 20 ऑगस्ट
पसंतीक्रम भरण्याची मुदत – 21 व 22 ऑगस्ट
मुक्त फेरीची निवड यादी – 23 ऑगस्ट
प्रवेश कालावधी (मुक्त फेरी) – 24 ते 26 ऑगस्ट