
नापता व्यक्तीबाबत निवेदन
रत्नागिरी, दि. ६ ):- संगमेश्वर तालुक्यातील मांजरे सानेचीवाडी येथून रत्नू रघु पाड्ये वय ९६ वर्षे हे १८ एप्रिल २०१८ पासून नापता आहेत. सदर व्यक्तीचे वर्णन रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, केस दाढी अधूनमधून पिकलेले, दात पडलेले, कंबरेला दोरा, अंगात लाल रंगाचा हाप शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची नाडीची चड्डी, कंबरेला पानाचा बटवा असे आहे. घरात कोणालाही न सांगता निघून गेले असून नातेवाईकांकडे व अन्य ठिकाणी शोध घेतला असता ते नेहमी वापरत असलेली काठी मांजरे खाडी किनारी बंधाऱ्याचे दगडावर सापडली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे सुतारवाडी येथील सोमा भिकू कळंबटे वय ७० वर्षे हे २५ ऑक्टोबर २०२० पासून राहत्या घरातून नापता आहेत. सदर व्यक्तीची उंची ५ फूट ५ इंच, बांधा मध्यम चेहरा उभट, रंग सावळा केस काळे, अंगात निळ्या पांढऱ्या रंगाचे हाफ टि शर्ट, नेसणीस राखाडी रंगाची हाफ पँट, डोक्यात गांधी टोपी, हातात काठी व डाव्या हातात पानाची पिवळ्या रंगाची पिशवी, पायात चप्पल नाही.
वरील व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.