
मुंबई-गोवा महामार्गावर भरणेनजिक कार अपघातात दोघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे जाधववाडीनजिक शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी कार रस्त्यालगत गटारात कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात ५ पैकी शुभेदा शाह (८५), अरबाज शाह (२७, दोघे रा. कणकवली) हे दोघे प्रवासी जखमी झाले. दोघांनाही तातडीने उपचारासाठी भरणे येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना मदतकार्य केले.www.konkantoday.com




