जिल्ह्यात ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” मोहीम : मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे

रत्नागिरी : सांस्कृतिक मंत्रालयामार्फत देशभरात ” हर घर तिरंगा” मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे. यावर्षीच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छताः स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग” या अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर करुन, या मोहिमेत नागरीकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वेदेही रानडे यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) व जलजीवन अभियान अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन, स्रोत संरक्षण आणि जनजागृती वाढविण्यासाठी एक आठवडा ही मोहीम आयोजित करून स्वातंत्र्य दिन साजरा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ज्याचा शेवट प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभात होईल. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) सन २०१४ मध्ये सुरू झाले असून अभियानाचे उद्दिष्ट संपूर्ण देशात सार्वत्रिक स्वच्छता व्याप्ती साध्य करणे व स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे. पंतप्रधान यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी “जलजीवन अभियान : हर घर जल” सुरू केले आहे. ज्यामुळे प्रत्येक घराला स्वच्छ नळाद्वारे पाणी पुवरठा करण्याचे उद्दिष्ट आहे. देशात १५ ऑगस्ट रोजी (दोन्ही महत्वाकांक्षी अभियानाचा वर्धापन दिन) स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, स्वच्छता मोहिमेद्वारे नागरी जबाबदारी, पर्यावरणीय व्यवस्थापन व राष्ट्रीय अभिमानाची मूल्य बळकट करण्याचा हा एक महत्त्वाचा क्षण आहे.

या मोहिमेत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) (SBM-G) व जलजीवन मिशन (JJM) अंतर्गत गावे/ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये या मोहिमेचा गावात शुभारंभ करणे, जनजागृती उपक्रम राबविणे, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांद्वारे स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा घेणे, गावात लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे, पाणी आणि स्वच्छतेची उपांगे (सार्वजनिक शौचालये, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, प्लास्टिक व्यवस्थापन केंद्र परिसर) यांची स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबविणे, सांडपाण्याचे व्यवस्थान करणे, पाण्याची गळती शोधणे व थांबवणे, जलजीवन मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे (पाण्याच्या टाक्या, स्त्रोत, नळ जोडणी, पंप हाऊस इ.), कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिक करणे, जलसंवर्धन, भुजल पुनर्भरण, जलस्त्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टिक टाळणे आदीबाबत जनजागृती करणे, स्वच्छताबाबतचे आव्हान व उपाय योजना या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकांचे आयोजन करणे, पाणी व स्वच्छतेच्या पायाभूत सुविधांच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणे निश्चित करून ध्वजारोहण करणे, “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत वैयक्तीक कुटुंब स्तरावर ध्वजारोहण करणे, स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा ग्रामपंचायत स्तरावर सत्कार करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या मोहिमेसाठी हॅशटॅग “#Har GharSwachhta च #HarGhar Tiranga” ही आहे. या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेच सदस्य, पाणी व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य, शालेय विद्याथ्यर्थी, स्वयंसेवक, नागरिक यांचा सहभाग घेतला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button