
चिपळूण शहरातील रावतळे भागातील एका वृद्ध महिलेचा खून,? हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे चिपळूण शहरातील रावतळे भागातील एका वृद्ध महिलेचा घातपात झाल्याचा प्रकार उघड झाला आहे वर्षा जोशी (वय 68) नामक एका महिलेचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिला हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आल्याचे समजते. त्यामुळे तिचा खून करण्यात आला असावा असा दाट संशय व्यक्त होत आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले याप्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू करण्यात आला आहे