
बॅनर फाडणार्या मुलाची होणार मानसिक तपासणी करण्याची वंचित आघाडीची मागणी.
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर फाडणार्या अल्पवयीन मुलाची मानसिक वैद्यकीय तपासणी पोलिसांनी करावी, अशी मागणी वंचित आघाडी व हातखंबा ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी मागणी मान्य करत मुलाची मानसिक तपासणी करण्यासाठी मुलांसह आई-वडिल यांना बोलावून ती तपासणी करून घेणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, तो बॅनर स्वतःहून फाडल्याचे सांगितले असून इतर कोणीही त्याला हे कृत्य करण्यास सांगितलेले नाही. कृत्य करण्यास सांगितल्याचा संशय वाटत असेल तर अशा व्यक्तीचे आपण नाव सांगावे तशीही चौकशी करू, असे यादव यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आलेल्या बौद्ध ग्रामस्थांसह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजन कांबळे यांसह तालुक्याचे पदाधिकारी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.www.konkantoday.com