
कोकण रेल्वे मार्गावर रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या धावणार!
कोकण रेल्वे मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव स्थानकांदरम्यान धावणार आहेत.
यामध्ये, गाडी क्र. ०११२५ लोकमान्य टिळक ट. ते मडगाव ही गाडी १४ ऑगस्ट ३०२५ रात्री १०.१५ वाजता सुटून मडगाव येथे १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. ०११२६ मडगाव ते लोकमान्य टिळक ट. ही गाडी १५ ऑगस्ट २०२५, दुपारी १.४० वा. सुटणार आहे. तसेच लोकमान्य टिळक ट. येथे १६ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०५ वाजता पोहचणार आहे. गाडी क्र. ०११२७ लोकमान्य टिळक ट. ते मडगाव ही गाडी १६ ऑगस्ट २०२५, रात्री १].१५ वाजता सुटून मडगाव येथे १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहचेल. गाडी क्र.०११२८ मडगाव ते लोकमान्य टिळक ट. ही गाडी १ ऑगस्ट २०२५, दुपारी १.४० वाजता सुटून लोकमान्य टिळक ट. येथे १८ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०५ वाजता पोहचेल. यासर्व गाड्या ठाणे, पनवेल, पेन, रोहा, मंगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत.
या गाड्यांचे आरक्षण ९ ऑगस्ट २०२५ पासून सर्व बुकींग केंद्रांवर, कोकण रेल्वे वेबसाइटवर आणि इंटरनेटद्वारे सुरु होणार आहे. अधिक माहितीसाठी कोकण रेल्वेची वेबसाईट पहाण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.