
कुठेतरी अचकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर
आबलोली :
आमचे नेतृत्व हे शांत संयमी आहे. कुठेतरी आजकट विचकट बोलन ही आमची परंपरा नाही असा टोला कुणाचेही नाव न घेता भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी गुहागर येथील निसर्ग हॉटेलच्या हॉलमधील पत्रकार परिषदेत लगावला.
भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर पुढे म्हणाले की, आमच्या नेत्यावर काही दिवसात आरोप केले जातात आणि आरोप करणारे जे आहेत त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकू लागले आहे काही दिवसापूर्वी वेळणेश्वर गटात झालेली स्थित्यंतरे याचा राग येऊन काहीतरी बोलायचं आमच्या अंतर्गत बाबी असतील त्याला त्याच स्तरावर उत्तरे दिली जातील परंतु उगाचच आपल्या बुडाला काहीतरी आग लागलेय आणि ती दाखवू नये म्हणून आमच्या नेत्याबद्दल काहीतरी बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही तालुका अध्यक्ष अभय भाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण तालुका अध्यक्ष उदय घाग, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष विनायक सुर्वे,आशिष विचारे, प्रांजली कचरेकर, अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, श्रीकांत मोरे, विजय मसुरकर, रवी अवेरे आदि. कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.