एम-सँड (कृत्रिम वाळू) धोरणावर गुरुवारी चर्चासत्रमहसूल सप्ताह समारोप


रत्नागिरी, दि. ६ :- राज्यात वाळूची उपलब्धता कमी होत असल्याने तसेच भविष्यातील विकासासाठी वाळूची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने एम-सँड (कृत्रिम वाळू) ला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात तसेच महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने उद्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अल्पबचत सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी, नवीन मानक कार्यप्रणाली, एम-सँडची आवश्यकता, युनिटधारकांना मिळणारे फायदे, एम-सँड युनिटसाठी आवश्यक परवानग्या आणि त्या कोणत्या विभागाकडून मिळतील यावर सविस्तर माहिती दिली जाईल.
जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांनी या चर्चासत्रात उपस्थित राहून एम-सँड धोरणाविषयी माहिती घेण्याचे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी भा. न. जोशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button