
अपघात रोखण्यासाठी हातखंबा येथे प्रशासनाने वेगवेगळी उपाययोजना केली
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारात वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी अखेर प्रशासनाला जाग आली आहे. येथे रस्त्याकडेला असलेले झाड तोडण्यात आले असून उतार कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु झाली आहे. तसेच वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला ठेकेदाराकडून कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रशौसून अपघात घडण्याची वाट पाहत होते का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
हातखंबा येथे ४ ऑगस्ट रोजी सकाळी नियंत्रण सुटलेल्या एलपीजी गॅस टँकरने चार दुचाकी व दोन टपरींचा चुराडा केला होता. दैव बलवत्तर म्हणून कुणी या अपघातात गंभीर जखमी झाले नाही. तर काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एलपीजी टैंकर रस्त्याकडेला उलटल्याने त्यातून गॅस गळती झाली होती. वेळीच प्रशासनाने गॅस गळती रोखली अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. अपघातांच्या घटनांनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी रास्ता रोको केला होता.
ग्रामस्थांनी यावेळी रस्ता पूर्ण होईपर्यंत येथून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी उतार कमी करावा, अशा काही मागण्या करण्यात आल्या होत्या. तसेच ठेकेदाराला घट्नास्थळी बोलावून घेण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर घटनास्थळी आलेल्या ठेकेदार व प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे मान्य केल्याने ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.www.konkantoday.com