
‘अंगदान’ जीवन अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये १० नेत्रदात्यांचा आदर्श!
अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षभरात दहा व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. या सकारात्मक घटनेचा उल्लेख करत त्यांनी जिल्ह्यामध्ये अंगदान व नेत्रदानाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नेत्रदानासोबतच इतर अवयवदानासाठीही नागरिकांनी नोंदणी करून या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. जगताप यांनी केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने गतवर्षी दहा जणांनी केलेले नेत्रदान हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. या उदाहरणावरून अधिक लोकांनी पुढे येऊन अंगदान करावे. असे त्यांनी केले. एका ’ब्रेन डेड’ व्यक्तीच्या केले. अवयवदानातून हृदय, यकृत, किडनी आणि डोळ्यांसारखे अवयव दान करून आठ गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते. दान-महादान यातूनच ’मृत्यूनंतरही जीवन देता येते!’ हे वचन प्रत्यक्षात उतरू शकेल, असे ते म्हणाले. या कार्याला अधिक गती देण्याचे आवाहन केले.www.konkantoday.com