
HPV लसीकरणाबाबत पालक सभा संपन्न – डॉ निवेंडकर यांनी सांगितले लसीकरणाचे महत्त्व..
मालगुंड (ता. रत्नागिरी) | दिनांक : ०६ ऑगस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रमालगुंड आणि प्राथमिक शाळा निवेडी खालची भगवतीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत पालक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेचे आयोजन शाळेतील मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी करण्यात आले होते.सभेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी व उपस्थित आरोग्य सेविका HPV यांनी लसीकरणाचे फायदे, लसीकरणाची सुरक्षितता, आणि त्याचा गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधामध्ये होणारा उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली.
लसीकरणासाठी कोणत्या वयोगटातील मुलींना प्राधान्य आहे, लस किती मात्रा आणि केव्हा द्यायच्या, याबाबतही स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांच्या शंका समाधानासाठी विशेष सत्रही घेण्यात आले.पालकांनी लसीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आपल्या मुलींच्या आरोग्यासाठी ही लस आवश्यक असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी शाळेचे मुख्यद्यापक श्री. शिरकर सर, cho अक्षदा शिर्षेकर, आरोग्य सेविका वीणा शिरगांवकर, दीपा गावडे, आरोग्य सेवक श्री सुरेश अंबुरे, आशा सेविका वैष्णवी घाणेकर आणि शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.