
बीएसएनएलची यंत्रणा कोलमडली, चाईल्ड राईट आयोगाकडून बीएसएनएलला लेखी पत्र
रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी बीएसएनएलची यंत्रणा कोलमडली असून अनेक ठिकाणी मोबाईल रेंज तसेच मोबाईलवरील इंटरनेट सेवा मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. दापोली तालुक्यात देखील बीएसएनएल यंत्रणा सुरळीत नसल्याने नाराजी आहे. दापोलीतील बीएसएनएलच्या यंत्रणेबाबत नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट या आयोगाने बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्यांना पत्र पाठवले आहे. ही संस्था भारतीय सरकारचाच एक भाग आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा सर्व शाळांचा प्र्रयत्न आहे. प्राथमिक शाळांपासून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट सेवेची आवश्यकता आहे. मात्र सध्या दापोली परिसरात ही यंत्रणा सुरळीत नाही. अशामुळे मुले दडपणाखाली येवू नयेत याची आपण काळजी घ्यावी व तातडीने याबाबत ऍक्शन घ्यावी व त्याबाबतची माहिती आयोगाला कळवावी असे पत्र पाठविले असून तसेच पत्र दापोली आंजर्ले गावातील नेटवर्कबाबत आयडीया कंपनीला देखील या आयोगाने पाठविले आहे.
www.konkantoday.com