
भाजपा रत्नागिरी शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर शाळा क्र. २१ मध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहरच्या वतीने संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या भागात गरजू विद्यार्थी शासकीय शाळा यांना मोफत वह्या वाटप, गरजूंना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपूर्ण शहरात केला जात आहे.
आज प्रभाग क्रमांक ६ मधील छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर आंबेशेत शाळा क्र. २१ नगरपरिषद शाळेमध्ये शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या माध्यमातून ५२ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक कणमुसे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
जनता पार्टीचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी आपले मत व्यक्त करताना गरजूंना शक्य तितके सहकार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केले जात असल्याचे सांगत यानंतरही कोणत्याही प्रकारे मदत लागल्यास मी आपल्या सोबत आहे हा विश्वास दिला. या कार्यक्रमांमध्ये ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ताताई रूमडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, गुरुप्रसाद फाटक, प्रज्ञा टाकळे, निधी आखाडे, प्रवीण रूमडे, पूजा पवार, तेजस पवार आदि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.