
पोलवर सुलभपणे चढता यावे यासाठी वायरमनने बनवली ’अनोखी’ शिडी.
राजापूर तालुक्यातील ससाळे येथील वायरमन महेश रत्नू तांबे हे १४ वर्षे राजापूर तालुक्यातील जांभवली, हसोळ, सोल्ये रेल्वेस्टेशन, ससाळे व आंगले या गावात आपली प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत यांनी वीज खांबावर चढण्यासाठी अनोखी शिडी बनवली आहे. यामुळे वीज खांबावर चढून काम करणे सोपे झाले आहे.काम सोपे, सुरक्षित व लवकर कसे होईल याकडे त्याचे लक्ष असते. विना अपघात आपले दैनंदिन काम कसे पार पडेल याकडे महेशचे कायम लक्ष असते. त्यांने बनविलेल्या शिडीची दुचाकीवरुन ने-आण करता येते. पावसाळ्यात कोकणात जास्त पाऊस पडत असल्याने वीज खांब निसरडे होतात. वायरमनना वीज गेल्यावर खांबांवर चढून दुरुस्ती करणे भाग असते. यावेळी वर चढताना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु तांबे यांनी बनवलेली लोखंडी शिडी ही सलग नसून छोट्या छोट्या शिड्या एकात एक जोडून हवी तेवढी उंच नेऊ शकता. त्याशिवाय वर गेल्यावर त्यांच्याकडे लाकडाचा ओंडका असतोच त्यावर हवा तेवढा वेळ बसून काम करता येते. नंतर त्या शिड्या वेगवेगळ्या एका पुन्हा एकत्र बांधून ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतात. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अशी शिडी जर इतर वायरमनने वापरली तर वीज खांबावर विना अपघात व सुरक्षित काम शकतो, असे महेश तांबे यांनी सांगितले.www.konkantoday.com




