
नागरी आरोग्य केंद्र झाडगाव येथे जागतिक स्तनपान सप्ताह चे आयोजन

बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच महिलांना कुठेही आणि कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह” साजरा करण्यात येतो.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षाची थीम : “स्तनपानाला प्राधान्य द्या : शाश्वत सहाय्यक व्यवस्था तयार करा”अशी आहे.
याअनुषंगाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र झाडगाव ता. रत्नागिरी येथे जागतिक स्तनपान सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कांबळे, जिल्हा रुग्णालयाच्या पेडियाट्रिक सिस्टर स्मृती जाधव यांनी उपस्थितांना स्तनपानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी झाडगावच्या एलएचव्ही सायली शिगवाज, केशर अंबेकर,आशा गट प्रवर्तक प्रणिता कुंबळे, आशा सेविका, अन्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.