
नगर भूमापनकडून गुरुवारी जिवंत मिळकत पत्रिका उपक्रम
रत्नागिरी, दि. ६ ):- महसूल सप्ताहातंर्गत नगर भूमापन कार्यालयाकडून गुरुवार ७ ऑगस्ट रोजी शिरगाव व मौजे हातखंबा येथे जिवंत मिळकत पत्रिका उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळकत पत्रिकेवरील मयत धारकांचे वारस नोंदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया या उपक्रमात पार पाडली जाणार असून मिळकत पत्रिकेवरील धारकांची नावे अद्यावत केली जाणार आहे. उद्या होणाऱ्या मौजे शिरगाव व मौजे हातखंबा येथे हा उपक्रम होणार आहे. नागरिकांना कार्यालयात न येता घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन कार्यालयाने केले आहे.