
देवरुख बसस्थानकात बेकायदेशीर वाहने पार्किंग केल्यास कारवाई होणार.
देवरुख शहरातील बसस्थानक परिसरात दुचाकी पार्किंग एसटी वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. नो पार्कंगचे फलक लावण्यात आले असून याठिकाणी वाहने उभी केल्यास याची छायाचित्रे आरटीओ कार्यालयाकडे सादर करत संबंधित वाहनांवर कारवाई होणार आहे.शहरात पार्कंग व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. तसेच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुतर्फा दुचाकी लावल्या जात असल्याने एसटी बसना जाता-येता अडथळा निर्माण होत आहेआगार व्यवस्थापकांनी प्रवेशद्वारानजीक बॅलर लावून बस येण्यासाठी व जाण्यासाठी दोन मार्ग तयार केले आहे. याच पार्श्वभूमीवर नो पार्कंगचे फलकही झळकले आहेत. कोणत्याही वाहनाला बसचा धक्का लागून अपघात झाल्यास अपघाताची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वाहन चालक-मालकाची राहील, असे स्पष्ट केले.काही प्रवासी दुचाकी लावून कामासाठी पुढे मार्गस्थ होतात. वाहन चालकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बसस्थानक परिसरात पार्कंगची व्यवस्था आहे.www.konkantoday.com