
चिपळुणातील नगरपालिका व महावितरण वादावर पालकमंत्र्यांनी घेतला अधिकार्यांचा चांगलाच समाचार
वीजबिलामुळे महावितरण कंपनीने नगर पालिकेच्या जॅकवेलचा वीजपुरवठा खंडित केला तर त्याला प्रत्युत्तर देत नगर, पालिकेने महावितरणच्या शहराला वीजपुरवठा करणार्या उपकें द्राला सील ठोकले. यामध्ये जनतेचे हाल झाले. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दोन्हीं कार्यालयातील अधिकार्यांचा फटकारत चांगलाच समाचार घेतला. एकाने गाय मारली, म्हणून दुसर्याने वासरू मारायचं का, ही कुठली पध्दत असे बजावत यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी दिली. तसेच झालेला प्रकार चुकीचा असून दोघांनाही समज देणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, माजी आमदार रमेशभाई कदम, प्रशांत यादव व आ. भास्करशेठ जाधव यांच्याबाबतच्या राजकीय प्रश्नांना बगल देत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.www.konkantoday.com