
उबाठाचे अनेक पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश, रामदास कदम यांचा ठाकरे शिवसेनेला धक्का
शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का दिला. अलसुरे, शिर्शी, कोंडीवली, उन्हवरे, संगलट येथील ’उबाठा’च्या शेकडो आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भरणे येथील अनेक कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला.
शिवसेनेत प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन भरणे येथील हॉटेल बिसू येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. सर्व प्रवेशकर्त्यांचा शिवसेना नेते रामदास कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. गावांच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन यावेळी शिवसेना नेते कदम यांनी प्रवेशकर्त्यांना दिले.
www.konkantoday.com