
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कंत्राटदारांनी केलेल्या शासकीय कामांपोटी तब्बल 500 कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कंत्राटदारांनी केलेल्या शासकीय कामांपोटी तब्बल 500 कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकित आहेत. त्यामुळे कंत्राटदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.तरी आपण याबाबत शासनाशी बोलून तोडगा काढावा, अशी मागणी सिंधुदुर्ग बांधकाम कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकार्यांनी आ. दीपक केसरकर यांच्याकडे केली.
याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सार्व. बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत झालेल्या विकासकामांची ही देयके मार्च 2025 पासून प्रलंबित आहेत. अनेक कंत्राटदारांनी ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जमिनी, दागिने तारण ठेवून बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र केलेल्या कामांची बिले न मिळाल्याने त्यांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. बँकांनी त्यांना नोटिसा पाठवल्या असून, यामुळे त्यांचा ‘सिबिल’ स्कोअर खराब झाला आहे. परिणामी, भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठिण होणार आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे