
संघटना, खासगी, स्वयंसेवी, सहकारी संस्था, वाहिन्या, सोशल मीडिया एन्फ्ल्यूएंसरपर्यटन प्रसिध्दी कार्यक्रमांना आर्थिक प्रायोजकत्वhttp://www.maharashtratourism.gov.in यावर प्रस्ताव पाठवा
रत्नागिरी, दि. ५ ):- आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर खासगी आयोजकांकडून (खासगी संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कार्यक्रम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या) आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभागाकडून प्रायोजकत्व स्वरुपात वित्तीय सहाय्य देण्यात येईल. त्याकरिता पर्यटन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन विषयक साहित्याची (कंटेट्स) प्रसिध्दी करण्यासाठी नामांकित व लोकप्रिय वाहिन्यांना आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएंसर (Influencer) यांच्यामार्फत तयार करण्यात येणाऱ्या पर्यटन विषयक साहित्यासाठी त्यांच्या फॉलोअर्स संख्येच्या आधारे प्रायोजकत्व देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताव विहीत नमुन्यात http://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमाच्या किमान ३० दिवस अगोदर सादर करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण व पर्यटनासाठी आकर्षक राज्यापैकी एक आहे. राज्याची समृध्द संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्व, विविध धार्मिक स्थळे व आधुनिक काळातील पर्यटनाच्या संधीमुळे देश-विदेशातील पर्यटक राज्यात आकर्षित होतात. पर्यटन वृध्दीसाठी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
पर्यटन विभागाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्यस्तरावर खासगी आयोजकांमार्फत पर्यटनाच्या प्रसिध्दीबाबत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पर्यटन प्रसिध्दी कार्यक्रमांना सोशल मिडीया, ओटीटी शो इत्यादी नवीन तंत्रज्ञानाच्या बदलास सकारात्मक प्रतिसाद देवून याबाबतचे सुधारित धोरण पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३० एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.