
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

रत्नागिरी : कै. गजानन पुरुषोत्तम दळी उर्फ भाई दळी क्रीडा महोत्सव निमित्ताने श्री राधाकृष्ण मंदिर संस्था आयोजित, जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने पुरुष एकेरी व पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट २१-१५ असा जिंकून चांगली सुरवात केली होती; परंतु रियाज याने दुसरा सेट आपल्या आक्रमक खेळाने २५-०० असा जिकला. तिसऱ्या सेट अतिशय चुरशीचा असताकारण ६ बोर्ड स्कोर १९-०६ असा असताना रियाज याने एक चागला रीबोड मारून तो बोर्ड ८ गुणाने जिंकायला संधी होती; परंतु रियाज याने शेवटची सोंगटी चुकल्यामुळे अभिषेक याला गेम मधील अंतर वाढवायला संधी मिळाली व आठवा बोर्ड ४ चा घेऊन २५-१५ ,००-२५ व २५-१० असे सेट जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेकचव्हाण व रियाज अकबरअली यानी सुरज आडिवरेकर व वरुण वरक जोडीचा २५–०१,०७-१२ व २५-०० असा तीन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला गटाचे विजेतेपद छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आकांक्षा कदम हिने राजापूरच्या निधी सप्रे हिचा २५-०० व १६ -१३ असा पराभव करून मिळवले. कुमार गटात रत्नागिरीच्या ओम पारकर याने जैतापुरचा आर्यन राऊत याचा तर किशोर गटात गहागरचा स्मित कदम याने जैतापुरच्या वेदांत करगुटकर याचा पराभव करून मिळवले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री राधाकृष्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू , सेक्रेटरी मकरंद खातू, सहसचिव निलेश भिंगार्डे, कार्यकारणी सदस्य राजेश रेडीज, योगेश मलुष्टे, अजय गांधी, सनातन रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, स्पर्धेतील प्रमुख पंच विनय गांगण, पंच सागर कुलकर्णी, स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर तसेच श्री राधाकृष्ण मंदिर संस्था मंडळाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा : पुरुष एकेरी : अंतिम सामना – अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध रियाज अकबरअली (२५-१५ ,००-२५, २५-१०). उपांत्य फेरी १- रियाज अकबरअली विजयी विरूद्ध अनिल गांधी (२५-१०,२५-०८). उपांत्य फेरी २ – अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध राहुल भस्मे (२५-१०, २५-०८). पुरुष दुहेरी : अंतिम सामना – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध सूरज आडिवरेकर / वरुण वरक (२५–०१,०७-१२, २५-००). उपांत्य फेरी १ – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध अनिल गांधी / सागर कुलकर्णी (२५-०८,१५-०५). उपांत्य फेरी २ – सूरज आडिवरेकर / वरुण वरक विजयी विरूद्ध दीपक वाटेकर / अभिजित खेडेकर (००-१८, १८-००, २५-००). महिला गट एकेरी : अंतिम सामना – आकांक्षा कदम विजयी विरूद्ध निधी सप्रे ( २५-०० / १६ -१३). उपांत्य फेरी १- आकांक्षा कदम विजयी विरूद्ध स्वरा कदम (१८-१३, २५-०३). उपांत्य फेरी २ – निधी सप्रे विजयी विरूद्ध स्वरा मोहिरे (२०-१४, १४-१६, २५-०९)
कुमार गट एकेरी : अंतिम सामना – ओम पारकर विजयी विरूद्ध आर्यन राऊत ( २०-०१, १७-०१). उपांत्य फेरी १- ओम पारकर विजयी विरूद्ध सर्वेश अमरे (१८-००, १७-०५). उपांत्य फेरी २ – आर्यन राऊत विजयी विरूद्ध हर्षल पाटील (१५-०५, ११-०३)
किशोर गट एकेरी : अंतिम सामना – स्मित कदम विजयी विरूद्ध वेदान्त करगुटकर (१२-०४,०९-१२,१६- ०९). उपांत्य फेरी १- स्मित कदम विजयी विरूद्ध कपिश देसाई (१६-००,१०-०६). उपांत्य फेरी २ – वेदान्त करगुटकर विजयी विरूद्ध आराध्य शेट्ये (१२-०६,०८-०२).
स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली. श्री राधाकृष्ण मंदिर संस्था यांच्या तर्फे सर्व खेळाडूंची जेवणाची वेवस्था करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर व श्री राधाकृष्ण मंदिर संस्था यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.