
यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची सरासरीच्या अर्ध्यावरच
दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात धो-धो कोसळून जिल्ह्यात सरासरीच्या जवळ जाणारा पाऊस यावर्षी मात्र सरासरीच्या अर्ध्यावरच थांबलेला दिसून येत आहे. किंबहुना गतवर्षी जुलै अखेरपर्यंत ७५ टक्के पाऊस कोसळलेला असतानाच यावर्षी मात्र तब्बल ८ तालुक्यांना ५० टक्के गाठतानाही दमछाक उडालेली दिसून येत आहे. गतवर्षी ३ ऑगस्टपर्यंत ७८.७५ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली असताना यावर्षी मात्र ती अवघी ५१ टक्केच आहे. यावर्षी सर्वाधिक लांजा तालुक्यात तर दापोलीत कमी पावसाची नोंद झाल्याचे महावेधच्या पर्जन्यमान अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com




