
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव यांचा २० हजारांनी पराभव झाला असता -रामदास कदम
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघातील जय-पराजय याविषयी मोठा दावा केला आहे. आपल्या जर तीन सभा झाल्या असत्या तर गुहागरचे चित्र बदलले असते. एवढेच नव्हे तर तब्बल वीह हजारांनी जाधव यांचा पराभव झाला असता असा दावा त्यांनी केला आहे.
गुहागर मतदारसंघातील एका कार्यक्रमात ते बोलताना त्यांनी खास करून आमदार भास्कर जाधव यांना लक्ष्य बनवत, माझ्या फक्त तीन सभा झाल्या असत्या, तर भास्कर जाधव हे २० हजार मतांनी पराभूत झाले असते, असे ते म्हणाले.
कदम यांनी यावेळी खंत व्यक्त करत सांगितले, की, मी एका कार्यकर्त्याला सभा लावायला सांगितलं होतं. पण तो माणूस हलायलाच तयार नव्हता. भावकीत कंदाल नको म्हणून नाव सांगत नाही, अशी उपरोधित टिप्पणी करत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
गुहागर मतदारसंघातील तीस ते पस्तीस हजारांचे मतदान आता आमच्याकडे वळाले आहे.. अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी आमच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे केवळ मतदान बघून विकासकाम करणार्या भास्कर जाधव यांच्याकडे आता काहीच काम उरलेलं नाही, असे वक्तव्य रामदास भाई कदम यांनी केले.www.konkantoday.com




