
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे आयोजित भव्य घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी शहर मर्यादित असणार आहे. रत्नागिरी शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले आहे.
ही स्पर्धा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांनी स्वतः समवेत आपल्या घरातील सजावटीचे छायाचित्र वेगवेगळ्या अँगलने काढून व एक मिनिटाचा व्हिडिओ (रिल) करायचा आहे व हा व्हिडिओ खालील दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. आलेल्या स्पर्धकांमधून अनुक्रमे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक काढले जाणार असून. प्रथम क्रमांकास ५५५५/- व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ४४४४/- व सन्मानचिन्ह , तृतीय क्रमांकास ३३३३/- व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेला व्हिडिओ व फोटो 9422432656,9960922035 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे. या स्पर्धेत गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी केले आहे.